नव परिणीत पालकांसाठी आर्थिक नियोजनाची मार्गदर्शक तत्वे | Aviva India

नव परिणीत पालकांसाठी आर्थिक नियोजनाची मार्गदर्शक तत्वे

नव परिणीत पालकांसाठी आर्थिक नियोजनाची मार्गदर्शक तत्वे

अविवामध्ये सर्वात जास्त बेफिकीर असलेला रवीश, आज अचानकच नवीन रूपामध्ये दिसत होता. तो नुकताच त्याची पितृत्व रजा संपवून आलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि आनंद या परस्परविरोधी भावनांचे अकल्पित मिश्रण दिसत होते, पण आम्ही काहीच मदत करू शकत नव्हतो. डोळ्यांमध्ये आशा आणि आनंद घेवून, तो एका वेगळ्याच स्वरूपात भासत आहे, हा आम्ही ओळखत असलेला बेफिकीर रवीश नक्कीच नाही - परंतु अधिक परिपक्व आणि निश्चयी रवीश आहे.

एका लहानशा बाळाच्या आगमनाचाच हा आनंद आहे. एका दिवशी आपल्या आयुष्यात एक छोटासा देवदूत येतो, आणि सर्व काही बदलून जाते. उशीरा रात्रीच्या पार्ट्यांपासून, उशीरा रात्रीच्या अंगाईगीतांपर्यंत, आपले जीवन प्रेम, काळजी, धकाधक आणि जबाबदाऱ्या यांनी भरून जाते.

आम्ही जाणतो की, एक मूल म्हणजे मोठी आर्थिक जबाबदारी असते. आणि चलनवाढ लाल-शिंगाच्या राक्षसासारखी असल्याने, हा खर्च कधीकधी डोईजड होतो. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, सध्याच्या काळात बाळ होण्यापासून त्याचे महाविद्यालयीन शिक्षण होईपर्यंत, एक मुल वाढवण्याची किंमत सुमारे 70 लाख रुपये आहे. 3 टक्के चलनवाढ दर लक्षात घेता, ही किंमत एक कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. आणि दरवर्षी फक्त 6 टक्के दराने चलनवाढ होत असेल, ही किंमत 1.7 कोटी एवढी वाढू शकेल.

तथापि, आपण नक्कीच नशीबवान आहोत, की आपण आपण अशा काळात वावरत आहोत, जिथे पैसे कमाविण्यासाठी, साठविण्यासाठी आणि गुंतवण्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. अविवा इंडिया मध्ये, आमची तुमच्याकडून फक्त एव्हडीच इच्छा आहे की, तुमच्या मुलाच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी एक ठोस आर्थिक योजना करण्याचे महत्त्व तुम्ही समजून घ्यावे. आपली चर्चा पुढे सुरू ठेवत, तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी, काही आर्थिक उद्दिष्टे आणि ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी काही गुंतवणुकीचे पर्याय पुढे दिले आहेत.

तुमच्या मुलाच्या शैक्षणिक खर्चासाठी गुंतवणूक करा

पालक म्हणून, तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी तुमच्यासमोर अनेक आर्थिक उद्दिष्ट्ये असतील. यापैकी एक उद्दिष्ट्ये तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करणे असेल. परंतु तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी फक्त बचत करणे पुरेसे नाही. शिक्षणाचा गगनभेदी वाढता खर्च भागविण्यासाठी, तुम्ही वाचवलेले पैसेदेखील वाढत आहेत, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

उपाय अविवा चाइल्ड प्लॅन पैकी कोणत्याही एकामध्ये गुंतवणूक करा, जे नुसते तुमच्या मुलाच्या शैक्षणिक गरजा भागवत नाही, तर तुम्ही जवळ नसल्यास तुमच्या मुलासाठी एक अखंडित शिक्षण सुनिश्चित करते. जेव्हा तुमचे मूल लहान असेल, तेव्हा तुम्ही चाइल्ड प्लॅनमध्ये गुंतविणे हिताचे आहे. जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल, तितके तुमच्या आर्थिक उद्दिष्टापर्यंत पोहोचणे सोपे आहे.

वैद्यकीय समस्यांमुळे तुमच्या योजना विस्कळीत होण्यापासून वाचवा

आरोग्य समस्या कोणाचीच आवडनिवड करत नाहीत. त्या कोणत्याही वेळी, कोणालाही होवू शकतात. त्यांना दूर ठेवण्यासाठी आपण खूप काही करू शकतो, परंतु बाह्य कारणांमुळे, वैद्यकीय समस्यांना आपण बळी न पडण्याची 100% खात्री देता येत नाही. आणि त्याहीवर, सतत वाढता वैद्यकीय खर्च ही देखील मोठी चिंता आहे.

उपाय - एखाद्या आरोग्य समस्येमुळे, तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी केलेली सर्व बचत तुम्हाला अनिच्छेने खर्चायला लागू नये, हे सुनिश्चित करण्यासाठी, तुम्ही आणि तुमच्या प्रियजनांकरिता हेल्थ प्लॅन घेणे, हिताचे आहे.

वस्तुस्थिती- डब्ल्युएचओच्या अहवालानुसार, भारतात मधुमेह, कर्करोग, दीर्घकालीन श्वसन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यांसारख्या जीवनशैलीशी निगडित रोगांमुळे जवळजवळ 60 टक्के मृत्यू होतात. प्रत्येक सरत्या वर्षानिशी हे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे. आणि त्यामुळेच, एक स्वतंत्र योजना म्हणून क्रिटीकल इलनेस प्लॅन विकत घेणे किंवा तुमच्या आत्ताच्या आरोग्य विम्यासह राइडर जोडून घेणे हिताचे आहे.

नजीकच्या भविष्यातील नियमित उत्पन्नासाठी आज गुंतवणूक करा

तुमच्या मुलाच्या शैक्षणिक गरजांसाठी बचत आणि वैद्यकीय आणीबाणीसाठी 'आर्थिकदृष्ट्या' तयारी करण्याव्यतिरिक्त, तुम्हाला इतर अनेक टप्प्यांची देखील काळजी घेणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, तुमच्या नवीन घराच्या डाउन पेमेंटसाठी, कौटुंबिक सुट्टीसाठी, तुमच्या सेवानिवृत्तीसाठी आणि अशा इतर महत्वाच्या टप्प्यांसाठी तुम्ही बचत करणे आवश्यक आहे. या उद्दीष्टांसाठी बचत करणे महत्वाचे आहे, नाहीतर यामुळे तुम्ही मुलांसाठी केलेल्या नियोजित बचतींमध्ये व्यत्यय येवू शकतो.

उपाय - निश्चित आणि नियमित उत्पन्न देणाऱ्या, अविवाच्या सेव्हिंग्स प्लॅनच्या मदतीने तुम्ही हे प्राप्त करू शकता, ज्याद्वारे तुमच्या गृहकर्ज ईएमआयसारख्या आवर्ती खर्चासाठी नियमित उत्पन्न मिळते आणि मोठी दायित्वे भागविण्यासाठी एकत्र रक्कम मिळते जसे की थकित गृह कर्ज.

तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा निश्चित करा

एक पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांसाठी सर्वोत्तम गोष्टी इच्छिता. तुम्ही यासाठी एखादी योजना देखील तयार केली असेल. परंतु तुम्ही नसतांना देखील, ही योजना तुमच्या मुलाच्या सुरक्षित भविष्यासाठी ठरवलेल्या आर्थिक उद्दीष्टांचे संरक्षण करण्यास सक्षम आहे काय?

उपाय - प्रोटेक्शन प्लॅन (यालाच टर्म प्लॅन असेही म्हणतात) तुम्हाला हे करायला मदत करू शकते. तो जणू एक आर्थिक सुरक्षा कवच म्हणून काम करतो की ज्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या खर्चासाठी, किरकोळ किराणापासून वैद्यकीय बिलापर्यंत, तसेच थकीत गृहकर्जाची देखील काळजी घेतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च देखील भागवतो.

तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पहिली पायरी घ्या!

जोपर्यंत तुम्ही स्वत: साठी एक लक्ष्य निश्चित करत नाही, तोपर्यंत तुम्ही तेथे पोहोचणार नाही. त्यामुळे आणखी उशीर न करता, तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पहिले पाऊल पुढे घ्या. त्यांच्या भविष्यासाठी तुमची आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा. एकदा तुम्ही लक्ष्य निश्चित केल्यानंतर, तुम्हाला एक ठोस योजना तयार करणे सोपे होईल. तुम्हाला मदतीची आवश्यकता असल्यास, अव्हिवा येथे आम्ही फक्त एकच कॉल दूर आहोत. आमच्या तज्ञांपैकी कोणाशीही संपर्क करण्यासाठी, आम्हाला केवळ 1800-103-7766 वर कॉल करा.

वैधानिक इशारा: 25 वर्षांच्या एका निरोगी पुरूषास (धूम्रपान न करणाऱ्या) 1 कोटी रुपयांचा निश्चित लाभ मिळविण्यासाठी, 25 वर्षे काळासाठी (करांसहित). दैनिक हफ्ता वार्षिक ह्फ्त्यास 365 ने भागून मिळविलेला आहे. 

AN AUG 39/18

Talk to an Expert

Blog Category: 

Leave a Reply

15 + 0 =
Solve this simple math problem and enter the result. E.g. for 1+3, enter 4.